गिरीश बापटांना भाजपकडून पुणे शहर लोकसभेची उमेदवारी जाहीर?, अनिल शिरोळेंचा पत्ता कट झाल्याची सूत्रांची माहिती

2

मुंबई | लोकसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लवकरच देशभरातील भाजप उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. यातच एक महत्त्वाची बातमी येत आहे. गिरीश बापट यांना भाजपकडून पुणे शहराची लोकसभेची उमेदवारी मिळाली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळतेय. तर विद्यमान भाजप खासदार अनिल सिरोळे यांचा पत्ता कट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गिरीश बापट हे चार-पाच मतदारसंघाचे समन्वयक असताना देखील भाजपने बापट यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. काल रात्री मुंबईत झालेल्या बैठकीत बापट यांना पुण्यातून उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज किंवा उद्या भाजप बापट यांची उमेदवारी औपचारिकरित्या जाहीर करण्याची शक्यता आहे.

पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना डावलून भाजपने गिरीष बापट यांना उमेदवारी दिली. आज औरंगाबाद येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांचा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. यावेळी त्यांची औरंगाबादमध्ये एक बैठक होणार आहे. या बैठकीत उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. यासोबतच आज भाजपकडून देशभरातील उमेदवारांची पहिली यादी होण्याची शक्यता आहे.