पुणे: हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना दंड, निर्णयाविरोधात उद्या विनाहेल्मेट रॅली

पुणे | पुणेकरांचा हेल्मेटसक्तीला असलेला विरोध झुगारुन पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. पुण्यात कालपासून हेल्मेटसक्ती करण्यात आली. त्यानंतर पहिल्याच दिवशी विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केलीय. पुढे ही कारवाई अशीच सुरु राहणार असल्याची माहितीही पुणे पोलिसांनी दिली. मात्र, या विरोधात उद्या विनाहेल्मेट दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. ‘हेल्मेट सक्तीविरोधी कृती समिती’च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. हेल्मेट वापरण्याला विरोध नसून, सक्तीला विरोध असल्याचे कृती समितीने सांगितलेय.