प्रिया प्रकाश पुन्हा एकदा चर्चेत, रोशन अब्दुलसोबतचा लिपलॉक व्हिडिओ व्हायरल

मुंबई | डोळ्यांच्या इशा-यांनी रातोरात सुपरस्टार झालेली अभिनेत्री प्रिया प्रकाश पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळीही तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती किसिंग सीन देताना दिसतेय. तिचा आगामी सिनेमा ‘उरु अदार लव्ह’ मधील हा व्हिडिओ आहे. यामध्ये ती तिचा सहकलाकार रोशन अब्दुल राउफसोबत किसिंग सीन देतेय.

रोशन अब्दुल आणि प्रिया ऑनस्क्रिन केमिस्ट्री खुप रोमँटिक दिसतेय. दोघांची ऑफस्क्रिन केमिस्ट्रीही चर्चेत आहे. प्रिया इंस्टाग्राम अकाउंटवर रोशन अब्दुलसोबतचे अनेक रोमँटिक फोटोज शेअर करत असते. मागच्या वर्षी व्हॅलेंटाइन डेला ‘उरु अदार लव्ह’ सिनेमाचा टीजर लाँच करण्यात आला होता. यामध्ये प्रिया प्रकाशचा डोळा मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओला सोशल मीडिया यूजर्सने डोक्यावर घेतले आणि ती एका रात्रीत सुपरस्टार झाली. यावर्षी हा चित्रपट रिलीज होऊ शकतो.

‘श्रीदेवी बंग्लो’ सिनेमामुळेही वादात
‘श्रीदेवी बंग्लो’ हा प्रियाचा आगामी सिनेमा आहे. यामधून ती बॉलिवूड डेब्यू करतेय. पण रिलीज पुर्वीच हा सिनेमा वादात अडकला आहे. श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांनी सिनेमाच्या टीमला कायदेशीर नोटीस बजावली आहे.