मोदींनी केले देशातील सर्वात लांबीच्या पुलाचे उद्घाटन

आसाममधील ब्रम्हपुत्रा नदीवर देशातील सर्वाधीक लांबीच्या  बोगीबील पुलाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आसाम व अरुणाचल प्रदेशाच्या दक्षिण-उत्तर भागाला जोडणारा हा पूल 4.94 किमी लांबीचा आहे. याची खासियत म्हणजे यावरुन एकाचवेळी गाड्या आणि रेल्वे दोन्ही जाऊ शकतील.

चीनच्या सीमेजवळ असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने लष्करासाठी हा पूल अत्यंत महत्वाचा पूल ठरणार आहे.