पवारांनी वडिलांबाबत विधान केल्याने दुःख झाले, अहमदनगरमध्ये करणार नाही प्रचार-राधाकृष्ण विखे पाटील

2

मुंबई | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सुजय विखेंच्या प्रवेशानंतरची पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवारांनी त्यांच्या वडिलांबाबत केलेल्या वक्तव्याने दुःख झाल्याचे म्हटले. सुजयने आपल्याशी कोणतीही चर्चा केली नाही, असेही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

दरम्यान, यासंपूर्ण घटनाक्रमासंबंधी हायकमांडला भेटून वस्तुस्थिती मांडणार आहे. त्यानंतर हायकमांड घेईल तो निर्णयही मान्य करेल असे विखे पाटील यावेळी म्हणाले. तसेच बाळासाहेब थोरातांच्या वक्तव्यासंबंधी बोलताना, त्यांना उत्तर देण्यास मी बांधील नाही, असे ते म्हणाले. सुजयविरोधात अहमदनगरमध्ये प्रचार करणार नसल्याचेही ते म्हणाले.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

>> गेल्या दोन दिवसांच्या घटना पाहिल्यानंतर सातत्याने माध्यमांमधून बरेच काही सांगितले जात आहे. माध्यमांनीही मला प्रतिक्रिया विचारली. पण मी दोन दिवसांनी सर्वांच्या प्रतिक्रिया आल्यानंतर भाष्य करण्याचे ठरवले होते.
>> माध्यमांनी या सर्वावर तटस्थ भूमिका घेतल्याचा आनंद आहे. वस्तुस्थिती माध्यमांनी सर्वांसमोर आणली.
>> अहमदनगर निवडणुकीसंदर्भात केवळ माझ्या मुलासाठी हा संघर्ष घडला हे चित्र उभे केले जात आहे, ते अत्यंत चुकीचे आहे.
>> गेल्या दोन तीन महिन्यांत आघाडीच्या जास्तीत जास्त जागा निवडून याव्यात यावर चर्चा झाली. त्यात जो पक्ष निवडून येऊ शकेल त्याला जागा मिळाव्या अशी भूमिका होती. त्यातून अहमदनगरची जागा आम्ही मागितली होती.
>> सलग तीन निवडणुकांत राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले होते. त्यामुळे नगरला काँग्रेसचा उमेदवार निवडून येऊ शकतो असे आमचे मत होते. यावर बरीच चर्चा झाली.
>> योग्य समन्वय घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न होता. या संपूर्ण प्रकारादरम्यान माझ्या मुलाने वेगळा निर्णय घेताना माझ्याबरोबर चर्चा झाली नाही.
>> कोणताही निर्णय झालेला नसताना शरद पवारांनी माझ्या वडिलांविषयी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे होते. ते हयात नसतांना त्यांच्याबद्दल बोलणे योग्य नव्हते. त्यामुळे याबाबत ऐकूण दुःख झाले. आघाडीत असे विधान करणे योग्य नाही.
>> सुजयनेही पवारांच्या वक्तव्यापूर्वी निर्णय केलेला नव्हता. कारण आघाडीबाबतच्या चर्चा सुरू होत्या. पण तत्पूर्वीच हे विधान आल्यानंतर, आजोबांबतच्या अशा विधानानंतर सुजयने त्याचा निर्णय घेतला.
>> सुजयने घेतलेल्या निर्णयानंतर पक्षश्रेष्ठींना भेटून वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडणार आहे. त्यावर ते जो निर्णय घेतील. तो तुमच्यासमोर मांडणार आहे.
>> बाळासाहेब थोरात हायकमांडपेक्षा मोठे नाही. मी जे बोलायचे ते हायकमांडशी बोलेले. त्यांना स्पष्टीकरण देण्याचे बंधन माझ्यावर नाही.
>> अहमदनगरमध्ये प्रचारच करणार नाही. कारण त्यांना (पवारांना) आमच्या कुटुंबावरच विश्वास नसेल तर प्रचाराला जाऊन अविश्वासाचे वातावरण कशाला निर्माण करायचे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची पत्रकार परिषद, मुंबई

Radhakrishna Vikhe Patil ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಮಾರ್ಚ್ 14, 2019