देशभरात राजीव गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम, कोल्हापुरात यशवंतराव थोरातांची उपस्थिती

13

कोल्हापूर | भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशभर काँग्रेसचे नेते आज दिवंगत नेत्याच्या आठवणींना उजाळा देताना पाहायला मिळाले. कोल्हापुरातदेखील गांधी यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजीव गांधी यांच्या लहानपणीचे मित्र आणि नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात यांनी अनेक आठवणी सांगितल्या.

त्यांचा स्वभाव, त्यांचे काँग्रेसबद्दलचे मत आणि आत्ताच्या राजकारणात तरुणांचा कमी होणार सहभाग यावर थोरात यांनी भाष्य केल. विशेष म्हणजे गांधी घराण्याच्या तिसऱ्या पिढीशी थोरात यांचा संबंध आहे. त्यामुळं त्यांनी मांडलेल्या मताला खूप महत्व आहे.

दरम्यान, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज २९वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांनी त्यांची समाधी असलेल्या वीरभूमीवर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी हे यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनीही ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944  रोजी मुंबई येथे झाला होता. श्रीलंकेतील तामिळ दहशतवाद संपवण्यासाठी त्यांनी श्रीलंकेत शांतिसेना पाठवली होती. त्याच तामिळ दहशतवाद्यांनी 21 मे, 1991 रोजी तामिळनाडूतील श्रीपेरंबुदूर येथे महिला सुसाईड बॉम्बरच्या साहाय्याने राजीव गांधी यांची हत्या केली होती. या हत्याकांडाचा सूत्रधार असलेला प्रभाकरन याचा 2009-10 मध्ये श्रीलंकन सैन्याने खात्मा केला होता.