प्रकाश आंबेडकरांची सोलापुरातून लोकसभा लढवण्याची घोषणा, महाआघाडीत प्रवेशाच्या शक्यता मावळल्या

2

अकोला | प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीच्या महाआघाडीतील प्रवेशाच्या मावळ्या आहेत. त्याचे कारण म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी सोलापुरातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. अकोला येथील पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी ही घोषणा केली आहे, त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढणार हे जवळपास नश्चित झाले आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाआघाडीत समाविष्ट करायचे की नाही, यावरून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगली आहे. कधी एमआयएमच्या मुद्द्यावरून तर कधी संघाला घटनेच्या कक्षेत समाविष्ट करण्याच्या मुद्द्यावरून हा विषय लांबत चाललेला आहे. पण आता खुद्द प्रकाश आंबेडकरांनी त्यांची उमेदवारी सोलापुरातून जाहीर केलेली आहे. सोलापूर हा काँग्रेसकडे असलेला मतदारसंघ असून येथून सुशीलकुमार शिंदे यंदा लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आंबेडकरांच्या घोषणेनंतर सोलापूर मतदारसंघातील चि पूर्णपणे पालटण्याची शक्यता आहे.