यूएईपाठोपाठ पंतप्रधान मोदींना रशियाचाही सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर

एएम न्यूज नेटवर्क । लोकसभा निवडणुकीदरम्यान विरोधकांचे हल्ले सहन करत असलेल्या पंतप्रधान मोदींसाठी रशियातून खुशखबर आहे. नरेंद्र मोदींना जगातील आणखी एक सन्मान मिळाला आहे. रशियाने पीएम मोदींना आपला सर्वोच्च नागरी सन्मान- सेंट अँड्रयू अवॉर्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनीही याला मंजुरी दिली आहे. मागच्या काही दिवसांत पंतप्रधानांना अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान मिळालेले आहेत. संयुक्त अरब अमिरातीनेही नुकतेच त्यांना झायेद मेडल जाहीर केले होते.

रशियन दूतावासाने आपल्या एका जबाबात म्हटले आहे की, ”12 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेंट अँड्रयू म्हणजेच रशियाच्या सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” पंतप्रधानांना हा सन्मान रशिया आणि भारतादरम्यान द्विपक्षीय संबंध मजबूत केल्यामुळे देण्यात येत आहे.

हा सन्मान मिळणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरतील. यापूर्वी हा सन्मान रशियाचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनाही मिळालेला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले जगातील ‘नंबर वन’ नेतृत्व

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून ओळख निर्माण झाली आहे. 2019 वर्ल्ड लीडर ऑन फेसबुक अहवालानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेसबुक पेजला 4.35 कोटी लाइक्स मिळालेले आहेत.
नरेंद्र मोदी यांनी फेसबुकवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्राझीलचे नवीन राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनाही मागे टाकले आहे.