माझ्या बापाचे काही झाले असेल, तर मी त्याचा जीव घेईन! : पंकजा मुंडे

139

बीड | मुंडे साहेबांना काही झालं असेल, तर त्या माणसाचा मी जीव घेईन. त्यानंतर माझा जीव जागच्याजागी जाईल. मला कोणत्याही तपास यंत्रणेची गरज नाही. असे आक्रमक विधान राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केज तालुक्यातील नांदूरघाट येथे आयोजित जाहीर सभेत केले.

पंकजा म्हणाल्या, लबाड लोकांना मुंडे साहेबांचा मृत्यू एक मोठी संधी वाटते. मी मुंडे साहेबांची लेक आहे. या जयंत पाटलाला शोभतं का? हे लोक म्हणतात, पंकजा मुंडे यांनी राजीनामा द्यावा. कारण मुंडे साहेबांची हत्या झाली. हत्या झाली का नाही हा विषय तुमचा नाही. जर तुम्ही छातीठोकपणे राष्ट्रवादीचे नेते आणि जे कुणी बोलतात तर चौकशीची सुरुवात तुमच्यापासून करावी लागणार. असेही त्या म्हणाल्या.