दुष्काळी मराठवाड्यात पाण्याची नासाडी, पैठण-जालना जलवाहिनीतून लाखो लिटर पाणी वाया

शेतांना तळ्याच स्वरूप

पैठण | तालुक्यातील राहाटगाव येथे जलवाहिनीचा वॉल लिक झाल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पाणी गळतीमुळे आसपासच्या शेतांना तळ्याचं स्वरुप आल आहे. या जलवाहिनीद्वारे जालना शहराची तहान भागविली जाते. मात्र जालना नगरपरीषदेच्या भोंगळ कारभारामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पैठण-जालना जलवाहिनीतून पाणी चोरी करण्याचे प्रकार बिनबोभाट सुरू आहेत. बहुतेक शेतकऱ्यांनी जलवाहिनी जवळच नवीन विहिरींच्या खोदकामास सुरूवात केली आहे. काही शेतकऱ्यांनी तर पाईपलाईनद्वारे थेट जलवाहिनीतून पाणी शेतात नेल आहे.