पाणीदार गावासाठी खरसोली ग्रामस्थांचे प्रयत्न, शासनाकडून रुपयाही न घेता श्रमदान

नागपूर | नगरखेड तालुक्यातील खरसोली या गावातील सर्व गावकरी पाणी फाउंडेशनमध्ये सहभागी होणार आहेत. गावातील सर्वांमध्ये पाणीफाउंडेशनविषयी जनजागृती निर्माण व्हावी म्हणून हातात मशाल पेटवून गावात जनजागृती करण्यात आली. न श्रमदान करून गाव पाणीदार करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे. नरखेड तालुक्यतील 72 गावांनी वाटरफाऊंडेशनमध्ये सहभाग घेतला आहे.

नरखेड तालुक्यात 2001 पासून दुष्काळाची तीव्रता नेहमीच जाणवत आहे. या वर्षी पावसाळा कमी झाल्याने पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. संत्रा व मोसंबीचे झाडे कसे वाचवयचे ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. नदी नाले तलाव डिसेंबरपासून कोरडे आहेत. जंगलात जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. शासकीय पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणा कुचकामी ठरत आहे. त्यामुळे गावातील पाणी गावातच, तर रानातील पाणी रानात थांबवण्यासाठी गावातील लोकांनी दुष्काळाशी दोन हात करण्याचा निर्धार केला आहे. लोकसहभागातून श्रमदान करून गाव पाणीदार करण्याचा चंग गावकऱ्यांनी बांधला आहे. पाणी फाउंडेशन ही आता लोकचळवळ झाली आहे. लोक आता आपले गाव सुंदर स्वच्छ आणि स्वयंपूर्ण करणे यासाठी पुढाकार घेत आहे.

नरखेड तालुक्यतील 72 गावांनी वाटरफाऊंडेशनमध्ये सहभाग घेतला आहे. गावातील लोक वर्गणी करून कामे करत आहे. शोषखड्डे ,शिवारफेरी, मातीपरीक्षण, पाणी बचत, सिमेंट बंधारे, शेततळे, छोटे मातीचे धरण, नालाखोलीकरन, रुक्षरोपन, यासारखी कामे श्रमदानातून दरोराज 8 तास केली जात आहेत. खरसोली गावातील माजी पंचायत समिती सभापती नरेश अरसडे हे स्वतः जबाबदारीने लोकांना सोबत घेऊन सरपंच नीलिमा अरसडे, सुदेश खुटाटे, प्रमोद बांदरे, भुवनेश्वरी निंबरकर, पवन आगे प्रवीण अरसडे पुढाकार घेऊन कामे करीत आहे.