भारताला आर्थिक महासत्ता बनविणार, निती आयोगाची योजना

नवी दिल्ली | भारताला आर्थिक महासत्ता बनविण्याची योजना निती आयोगाने आखली आहे. त्यासाठी ‘स्ट्रॅटेजी फॉर न्यू इंडिया@ 75’ हे धोरण नीती आयोगाने जाहीर केल आहे. 2030 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था साडे तीन लाख अब्ज रूपयांपर्यंत तर विकास दर 8 ते 9 टक्क्यांपर्यंत नेण्याचं उदिष्ट या योजनेतून समोर ठेवण्यात आले आहे.

देशाच्या स्वातंत्र्याला 2022 मध्ये 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने देशाच्या सर्वांगिण विकासासाठी बहुस्तरीय धोरण आखण्यात आले, अस निती आयोगाने जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, मेक इन इंडियाला वेग देणे, विज्ञान तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण इकोसिस्टिमवर भर देण्यात आला आहे. विकास हा सर्वांसाठी, समतोल, कायमस्वरूपी आणि पद्धतशीर असेल याकडे लक्ष दिले पाहिजे, असेही यात म्हटले आहे.