डान्सबार सुरु झाल्याने छोटा पेंग्विन खुश असेल: नीलेश राणे

मुंबई | महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केले आहे. डान्सबार सुरु झाल्याने छोटा पेंग्विन खूश झाला असेल, अशी बोचरी टीका त्यांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने महाराष्ट्रात डान्सबार सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावर ‘छोटा पेंग्विन खूश असेल, त्याच्या मुंबई नाइट लाइफची मागणी त्याने देवाकडे इतकी मनापासून केली, की डान्स बार चालू झाले’, असं ट्विट निलेश राणे यांनी केल आहे.

मागील काही दिवसांपासून नीलेश राणे शिवसेनेवर जोरदार हल्ला करत आहेत. दिवगंत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूवरून त्यांनी थेट बाळासाहेब ठाकरेंवर आरोप केले. यामुळे शिवसैनिकांनी काही ठिकाणी त्यांचे पुतळेही जाळले होते. या घडामोडी ताज्या असतानाच आता नीलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केल आहे.