एकाच विश्वचषक स्पर्धेमध्ये चार शतके ठोकणारा रोहित शर्मा दुसरा खेळाडू

याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता

स्पोर्ट्स डेस्क |  बांगलादेशविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यामध्ये भारताचा सलामीवीर रोहित शर्माने शानदार शतकी खेळी केली. 92 चेंडूच्या आपल्या खेळीमध्ये रोहितने 7 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 104 धावा केल्या. या खेळीमध्ये रोहितने मालिकेतील चौथे शतक ठोकले. एकाच विश्वचषक स्पर्धेमध्ये चार शतके ठोकणारा रोहित हा पहिला भारतीय ठरला आहे. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता.
 
104 धावांच्या या खेळीमध्ये रोहितने 5 षटकार लगावले. या षटकारांसहीत सलग सहा वर्ष एका वर्षात 30 हून अधिक षटकार मारणारा रोहित पाहिला खेळाडू ठरला आहे.

रोहित शर्माचे हे या विश्वचषक स्पर्धेतील चौथे शतक ठरले. दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि इंग्लंड या तीन संघांशी खेळताना रोहितने शतक झळकावले होते. त्यानंतर आता रोहितने बांगलादेशविरुद्ध शतक केले आहे. रोहितचे हे एकदिवसीय कारकिर्दीतील 26 वे शतक ठरले.

यापूर्वीच्या सामन्यात इंग्लंडविरूध्द रोहितने 25 वे शतक ठोकले होते. सर्वात जलद 25 शतके ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला. रोहितने 25 शतके ठोकण्यासाठी 206 डाव खेळले. या यादीत आफ्रिकेचा हाशिम आमला (151 डाव) अव्वल आहे. तर भारताचा कर्णधार विराट कोहली (162) दुसऱ्या स्थानी आहे.AM News Developed by Kalavati Technologies