Womens Day 2020: राष्ट्रपती कोविंद यांनी कर्तबगार महिलांचा नारीशक्ती पुरस्काराने केला सन्मान

देशातील कतृत्त्वान महिलांना त्यांनी नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित केले

नवी दिल्ली | आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या महिलांचा सन्मान केला आहे. देशातील कतृत्त्वान महिलांना त्यांनी नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित केले आहे. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईरानीही त्यांच्यासोबत होत्या.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतीय वायुसेनेच्या पहिल्या महिला फायटर पायटल मोहना जीतवाल, अवनी चतुर्वेदी आणि भावना कंठ यांना नारी शक्ती पुरस्कार प्रदान केला. यासोबतच बिहारच्या बिना देवीर, 103 वर्षांच्या मन कौर, अरिफा जान, चमी मुर्मू, कलावती देवी आणि पश्चिम बंगलाच्या कौशिकी चक्रवर्ती यांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित केले.AM News Developed by Kalavati Technologies