बुलडाण्यात महिलांचे साहित्य संमेलन संपन्न, कार्यक्रमाला जिल्हाभरातील महिलावर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती

कार्यक्रमाला जिल्हाभरातील महिलावर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती

बुलडाणा । बुलडाणा महिलांचे विविध विषय घेऊन सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने बुलडाण्यात महिला साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनामध्ये राज्यभरातील स्रीवादी विचारसरणीच्या महिला विचारवंतांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हाभरातील महिलावर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

महिलांच्या कार्याचा उहापोह व्हावा आणि सार्वजनिक जीवनामध्ये महिलांचा सहभाग वाढावा या दृष्टिकोनातून बुलडाण्यात महिला साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ताराबाई शिंदे साहित्य नगरी बुलडाणा येथील गर्दे सभागृहात पार पडलेल्या या साहित्य संमेलनाचे उद्घाटक सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता मुक्ता दाभोळकर यांची उपस्थिती होती. या साहित्य संमेलनात अनेक महिला विचारवंतांनी महिलांना मार्गदर्शन केले. साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पार पडलेल्या टॉक शोमध्ये दूरचित्रवाणीच्या निवेदिका ज्योती आंबेकर यांनीही मार्गदर्शन केले. यानंतर या संमेलनामध्ये मराठी बोलीभाषा खुला कवयित्री कट्टा रंगला काव्य गझल चित्र मैफलही सायंकाळी आयोजित करण्यात आली होती. शेवटी समारोपिय संमेलन अध्यक्षा सामाजिक कार्यकर्ती अहमदनगर येथील दिशा पिंकी शेख यांच्या उपस्थित पार पडल.AM News Developed by Kalavati Technologies