पॅडमॅन चित्रपटाच्या पाठिंब्यामुळे सॅनिटरी नॅपकिन निर्मितीत महिला झाल्या उद्योजक

उद्योगाची वाट धरत घेतली गगनभरारी बचत गटांनी सुरु केला उद्द्योग

वर्धा । वर्धा जिल्हा आष्टि शहिद पॅडमॅन मुळे मिळाली प्रेरणा सँनिटरी नॅपकिन निर्मितीतून महिलांनी साधली प्रगती उघडपणे चर्चा न करता येणाऱ्या महिलांच्या मासिक पाळीचा विषय आणि त्यांची कुचंबणा पॅडमॅन चित्रपटांमुळे सर्वांसमोर आली आता या विषयावर पुरुष सुद्धा महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृती साठी पुढे येत आहेत भारतात या उद्योगाला पोषक वातावरण तयार होत आहे. याचा वेध घेत आष्टी तालुक्यातील महिलांनी सॅनेटरी नॅपकिन च्या निर्मितीतून स्वयंरोजगार उभारला आहे मुख्य म्हणजे कोणत्याही आंतरराष्ट्रीय कंपनीला मागे टाकतील इतके दर्जेदार नॅपकिन या महिलांनी तयार केलेत.

"स्वच्छ सीक्योर" हे नाव घेउन दोन महिन्याच्या ट्रायल आणि फेल नंतर उत्तम दर्जाचे हे नॅपकिन बाजारात दाखल झाले यामध्ये महिलांची जिद्द मेहनत आणि हार न मानण्याची त्यांच्यातील गुणवत्ता यांचा चांगलाच कस लागला तरी मार्केटिंग हा प्रश्न होताच इतर उत्पादनाच्या तुलनेत आपले उत्पादन चांगली आहे हे पहिल्यांदा पटवून देण्यासाठी महिलांनी आष्टीतील सर्व मेडिकल स्टोर मध्ये जाऊन सदर नॅपकिन अतिशय कमी किमतीत उपलब्ध करून दिलेत. आज त्यांच्या नँपकिनला चांगली मागणी आहे मुख्य म्हणजे आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या तुलनेत अतिशय स्वच्छ आणि सिक्योर तर आहेच पण हे पर्यावरण पूरक आहे जमिनीत गाडल्यावर काही दिवसात त्याचे मातीत रूपांतर होते.
नँपकिन घेण्यास मुलिंनी दिला नकार"

महिलांनी तयार केलेले नँपकनीन पहिल्यानदा शाळेतील मुलिंना मोफत वाटले ,पण दुसऱ्यांदा शाळेत गेले असता मुलींनी नँपकिन घेण्यास नकार दिला कारण त्याची गुणवंता चांगली नाही असे मुलिंनी सागितले त्यामुळे हताश न होता महिंलानी जोमाणे प्रयत्न सुरु ठेवले ६३ कंपन्याचा सर्वे आणि त्यातल्या काहि कंपन्याना प्रत्यक्ष भेट देऊन नँपकिनचा गुणवंता वाढिसाठी प्रयत्न सुरु झालेत राष्ट्रिय आणि आंतरराष्ट्रिय बाजारातील कंपन्याच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर त्याच्यापेक्षा उत्तम दर्जाचे उत्पादन आणि किंमतही माफक ठेवण्याचे आव्हान महिलांसमोर होते त्यासाठी लागणारा कच्चा माल तसेच नँपकिन तयार करण्याची पध्दतही बदलवली.AM News Developed by Kalavati Technologies