मासिक पाळीबाबत ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण-मार्गदर्शन मिळणे काळाची गरज

तज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याने बोर्ली पंचतन गावचा नागरीक म्हणून आपण मोफत वैद्यकिय शिबीरे राबवून वंचितांना उत्तम आरोग्य सेवा पुरवण्याचे कार्य करणार असल्याचे प्रतिपादन

रायगड । ग्रामीण भागामध्ये मासिक पाळी किंवा त्यांच्या आजाराबाबची माहिती आपल्या मुलींना प्रत्येक आईने देणे गरजेचे आहे. परंतू लाजेपोटी सर्वच माहिती व आजाराबाबत योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने मुलींना याबाबत शिक्षण किंवा माहिती मिळणे सध्या काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. राजेश पाचारकर यांनी केले. बोर्ली पंचतन येथील श्री मोहनलाल सोनी विद्यालयामध्ये मुलींसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबीरामध्ये ते बोलत होते.

बोर्ली पंचतन, दिवेआगर, भरडखोल, आदगाव, वडवली, मेंदडी, दांडगुरी व परीसरातील ग्रामीण भागामध्ये वयामध्ये येणाऱ्या तरुण मुलींमध्ये मासिक पाळी याबाबत वेळेतच जनजागृती होणे गरजेचे असून त्याबद्दलचे समज गैरसमज समजावे या उद्देशाने मंडळ कार्यरत आहे. शिवाय आपल्या भागामध्ये तज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याने बोर्ली पंचतन गावचा नागरीक म्हणून आपण मोफत वैद्यकिय शिबीरे राबवून वंचितांना उत्तम आरोग्य सेवा पुरवण्याचे कार्य करणार असल्याचे प्रतिपादन डॉ. राजेश पाचारकर यांनी केले.

डॉ. पाचारकर मित्र मंडळाच्या वतीने आठ विद्यालयांमध्ये 1000 विद्यार्थीनींना सॅनेटरी नॅपकिन व 28 गरजू विद्यार्थीनींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. बोर्ली पंचतन येथील श्री मोहनलाल सोनी विद्यालयमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परीषद सदस्या सायली तोंडलेकर, पंचायत समिती सभापती मिना गाणेकर, सरपंच नम्रता गाणेकर, जनता शिक्षण संस्था कार्याध्यक्ष गणेश पाटील, सचिव श्रीराम तोडणकर, प्राचार्य जालिंदर पोटे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, डॉ. राजेश पाचारकर, आरती पाचारकर, डॉ. वृशाली साळुंखे, प्रशालेच्या सर्व महिला शिक्षिका तसेच विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. डॉ. राजेश पाचारकर यांनी मागील दोन वर्षापासून वैद्यकिय शिबीरे, गरजू विद्यार्थ्याना मदत, वैद्यकिय मार्गदर्शन असे उपक्रम राबवले असून त्यांचे श्रीवर्धन तालुका परिसरात त्यांच्या समाजकार्याबद्दल कौतुक होत आहे.AM News Developed by Kalavati Technologies