धक्कादायक! वर्ध्यात प्रेमीयुगुलाची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

वर्ध्यातील हिंगणघाट तालुक्यात ही आत्महत्याची घटना घडली असून, घटनेचं कारण अद्याप अस्पष्ट आहे

वर्धा । वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील सावंगी हेटी येथील विवाहित युवा जोडप्याने गावातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे या घटनेनंतर परिसरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. या मृत विवाहित प्रेमीयूगलाचे नाव राकेश देवराव सावंकार (३५) व नीलम राकेश सवांकार (३०) अशी आहे. दोन वर्षापूर्वी राकेश व नीलिमा या दाम्पत्याने प्रेम प्रकरणातून विवाह केला होता. त्यापुर्वी नीलिमाचे लग्न खैरी येथील युवकासोबत झालेले होते. मात्र तिचे राकेशसोबत प्रेमसंबंध असल्याने ती पतीला सोडून परत आली होती.

त्यानंतर राकेश व नीलिमा दोघेही हिंगणघाट येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. राकेश हा येथील एका खरडा फॅक्टरीत कामावर होता. एक महिन्यांपूर्वी राकेश व नीलीमा आपल्या सावंगी (हेटी) या मुळ गावी राहायला गेले होते. असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या दोघांचा सुखी संसार सुरु असताना त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्टच आहे. घरगुती कारणावरुन वाद झाल्यामुळे दोघांनी दुर्दैवी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. पुढील तापस हिंगणघाट पोलिस करीत आहे.



AM News Developed by Kalavati Technologies