दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री ते परराष्ट्र मंत्रिपद, असा होता सुषमा स्वराज यांचा राजकीय जीवनप्रवास

भाजप नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे 67 वर्षे वयात मंगळवारी रात्री निधन झाले

भाजप नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे 67 वर्षे वयात मंगळवारी रात्री निधन झाले. संध्याकाळी त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्वराज मागच्या काही काळापासून अस्वस्थ होत्या. भाजप नेते नितीन गडकरी आणि हर्षवर्धन एम्समध्ये पोहोचले होते. स्वराज यांच्या राजकीय प्रवासाविषयी बहुतांश जणांना माहिती नाही. सुषमा स्वराज यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1952 रोजी हरियाणाच्या अंबालामध्ये झाला होता. त्यांनी अंबाला छावणीच्या एसडी कॉलेजमधून पदवी शिक्षण पूर्ण केले. यानंतर पंजाब विद्यापीठातून एलएलबीची डिग्री मिळवली. त्या वक्तृत्व आणि वादविवादात कायम पुढे राहिल्या. त्यांनी अशा अनेक स्पर्धा आपल्या विद्यार्थिदशेत गाजवून अनेक पुरस्कारही प्राप्त केल्या.

1977 मध्ये झाली राजकीय प्रवासाला सुरुवात
सुषमा स्वराज यांनी सन 1977 पासून राजकीय कारकीर्दीला सुरुवात करून पहिल्यांदा निवडणूक लढली होती. यानंतर त्यांना चौधरी देवीलालच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले होते. यानंतर त्या अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री बनल्या.

सन 1999 च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकच्या बेल्लारीमधून काँग्रेस नेत्या सोनिया गांधींविरुद्धही निवडणूक लढली. स्वराज यांच्या नावे दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा विक्रमही आहे. एक प्रखर प्रवक्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा स्वराज सुरुवातीपासूनच संघ आणि भाजपशी जोडलेल्या होत्या.

प्रकृतीच्या कारणांमुळे सुषमा स्वराज यांनी या वर्षी झालेली सर्वसाधारण निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. सन 2014 च्या निवडणुकीत त्या मध्यप्रदेशच्या विदिशा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या.

सर्वोच्च न्यायालयातील वकिलाशी विवाह
अंबाला छावणीत हरदेव शर्मा आणि लक्ष्मीदेवी यांच्या घरी जन्मलेल्या सुषमा यांचा विवाह 13 जुलै 1975 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील स्वराज कौशल यांच्याशी झाला. त्यांना बांसुरी नावाची कन्या आहे, त्या लंडनमध्ये इनर टेंपलमध्ये वकिली करतात.

मान-सन्मान
- सन 2008 आणि 2010 मध्ये त्यांना सर्वश्रेष्ठ संसदीय पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या आणि एकमेव महिला खासदार आहेत.
- सन 1977 मध्ये फक्त 25 वर्षे वयात त्या कॅबिनेट मंत्री बनल्या होत्या. त्या वेळी त्या सर्वात कमी वयाच्या कॅबिनेट मंत्री होत्या.AM News Developed by Kalavati Technologies