Women's Day 2020 : कधीकाळी मोलमजुरी करून कुटुंबाचे भरले पोट, आता वर्षाला 10 लाखांची उलाढाल

पैठणच्या महिलेचा संघर्ष इतरांसाठीही प्रेरणादायी

पैठण | सामर्थ्य व कर्तृत्वाच्या भरारीतून चूल आणि मूल या मानसिकतेत बदल घडवून विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवत महिलांनी प्रगतीची कास धरली आहे. पैठण शहरातील एका महिलेनं मोठ्या कष्ठाने वीटभट्टीतून व्यवसाय सुरू करुन आपला व आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह केला आहे. शहरातील धनगरवाडा येथील रहीवाशी शंकुतला सरोदे ह्या अशिक्षित असताना विटभट्टीच्या व्यवसायातुन जवळपास दहा लाखाची अर्थिक उलाढाल करत आहे. विटभट्टीच्या व्यवसायातुन त्यांना वर्षाकाठी दोन लाखाचा नफा मिळतो. दहा वर्षापूर्वी शंकुतला सरोदे ह्या दुसऱ्याच्या विटभट्टी वर मजुरी करत होत्या. मात्र आता त्यांनी स्वत:चा विटभट्टी व्यवसाय सुरू केला आहे.

आज रोजी त्यांच्याकडे विट्भट्टीचे तीन आळे असुन मुकरदमासह 22 मजुर त्यांच्या हाताखाली काम करतात. शकुंतला सरोदे ह्या निरक्षर असताना देखील सगळा आर्थिक व्यवहार स्वत:च करतात. विटभट्टीची देखरेख आणि इतर अर्थिक व्यवहार बघण्यासाठी त्यांनी मुकरदम सुद्धा ठेवला आहे. महिन्याकाठी या मुकरदमाला शंकुतलाबाई दहा हजार रुपये पगार देतात. पतीपासून अलिप्त झाल्यानंतर आपल्या मुलीचे पालन पोषणाची जबाबदारी शकुंतलाबाई यांच्यावर होती. मुलींचे पदवी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी मोठ्या थाटामाटात आपल्या मुलींचा विवाह केला आहे.

अत्यंत कष्टकरी महिला म्हणून शंकुतलाबाईची या व्यवसायात ओळख आहे. महिलांनी कुणावरही अवलंबुन न राहता मेहनत व कष्टाने आपण आपली व आपल्या कुटूबांची प्रगती करु शकतो. असे शंकुतलाबाईने समाजाला दाखवून दिले आहे.AM News Developed by Kalavati Technologies