धक्कादायक! कोविड सेंटरमध्ये सुरक्षा रक्षकानेच केला महिलेवर बलात्कार

कोविड सेंटरमध्ये सुरक्षा रक्षकानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मीरा-भाईंदरमध्ये घडली आहे

मुंबई । मुंबईतील मीरा भाईंदर येथील गोल्डन नेस्ट कोविड सेंटरमध्ये सुरक्षा रक्षकानेच कोरोनाग्रस्त महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने बलात्कार करून; जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती. आज सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये तणावपुर्वक वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित आरोपींला नवघर पोलीसांनी अटक केली असुन त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षा रक्षकानेच महिलांवर बलात्कार केल्याची कोविड सेंटरमध्ये घटना घडल्याने महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.AM News Developed by Kalavati Technologies