धक्कादायक! पत्नीला चाकु भोसकुन, पतीने केली रेल्वेखाली आत्महत्या

शुल्लक कारणावरून पतीने पत्नीवर चाकूने हल्ला केला असून, त्यानंतर पती गणेश दुर्गंडे यांनी रेल्वे रूळाखाली आत्महत्या केली आहे

तळोजा । पतीने पत्नीवर चाकू भोसकुन त्यानंतर स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तळोजा येथे घडली आहे. परिसरातील नावडे फेज वन मध्ये पती-पत्नी मध्ये नेहमी घरगुती वाद सुरू होते. वाद विकोपाला जाऊन पतीने आज सकाळी साडे आठ वाजता पत्नीवर चाकुने वार करून, स्वतः रेल्वे पटरी खाली जाऊन आत्महत्या केली आहे. नगरसेवक अरविंद म्हात्रे यांच्या मदतीने पत्नीला रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेत अर्चना दुर्गंडे गंभीर जखमी झाली असून, त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

तळोजा नावडा फेज 2 मधील निलकमल साईदत्त कृपा सोसायटीमध्ये राहणारे गणेश दुर्गंडे व अर्चना दुर्गंडे पती-पत्नी राहत होते. त्यांना दीड वर्षाची मुलगी देखील आहे. गणेश व अर्चना यांच्यात नेहमी वाद होत असत आज सकाळी दोघांमध्ये भांडणही झाले व वाद विकोपाला गेल्याने, गणेश याने पत्नी अर्चना हिच्यावर चाकूने वार केले. यामध्ये अर्चना ही गंभीर जखमी झाली तिला रुग्णालयात दाखल केले आहे. वार केल्यानंतर गणेश घराबाहेर पडला व नावडे रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे पटरीवर जाऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस अधिक तपास करीत आहेत.AM News Developed by Kalavati Technologies