वर्धा । वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील शिवाजी वार्ड परिसरात किरकोळ वादावरून पतीने पत्नीसोबत केलेल्या मारहाणीत, पत्नीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मृत महिलेचे सौ.श्वेता सौरभ गुप्ता (वय ३७) असे आहे. पती सौरभ शिवदयाल गुप्ता व पत्नी श्वेता सौरभ गुप्ता या दोघांमध्ये वाद झाला होता. यावेळी पतीने पत्नीला जबर मारहाण केली.
त्यांनतर पती सौरभ शिवदयाल गुप्ता यांनी जखमी अवस्थेत पत्नी श्वेताला रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी श्वेताला तपासून मृत घोषित केले. यावेळी सौरभ यांनी मी मारहाण केल्यानेच पत्नीचा मृत्यु झाल्याची कबुली पोलिसांना दिली असून, पोलिसांनी सौरभला अटक केली आहे. पुढील तपास हिंगणघाट पोलिस करीत आहे.