धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा खून

पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी पाईपने वार करून खून केल्याची धक्कादायक, घटना पैठण येथील साठेनगर भागात घडली आहे

पैठण । चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी पाईपने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना पैठण येथील साठेनगर भागात घडली. या दुर्दैवी घटनेमुळे दोन चिमुकल्यांचे मातृत्व हरपल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. खुन केल्यानंतर आरोपी आत्महत्या करण्यासाठी गेला असता, त्याला जायकवाडी धरणावरून पोलीसांच्या ताब्यात दिल्याने त्याचा आत्महत्येचा प्रयत्न फसला. पतीने लोखंडी पाईपने डोक्यात घाव घातल्याने लक्ष्मी घोडके यांचा मृत्यू झाला असून विजेंद्र लक्ष्मण घोडके (३५) रा. साठेनगर पैठण असे पत्नीचा खुन करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आरोपी पती विजेंद्र घोडके, लक्ष्मीची सासू सुशीला घोडके व सासरा लक्ष्मण घोडके यांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढी तपास पैठण पोलीस करीत आहे.



AM News Developed by Kalavati Technologies