धक्कादायक! जन्मदात्या बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

मीरा-भाईंदरमध्ये बापानेच आपल्या पोटच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे

मुंबई । राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना, भाईंदर पश्चिममध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरात राहणाऱ्या एका नराधम बापानेच पोटच्या मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नराधम बापाला उत्तन सागरी पोलिसांनी अटक केली असून, 3 सप्टेंबरपर्यंत ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. भाईंदर पश्चिममध्ये उत्तन परिसरात राहणाऱ्या एका 9 वर्षीय मुलींवर वडिलांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घृणास्पद घटनेमुळे पालक वर्गात हाहाकार व संतापाची लाट पसरली आहे.

भाईंदर पश्चिममधील उत्तन परिसरात हे कुटुंब राहत आहे. पीडित मुलीची आई कामाला जात असे आणि त्याचाच फायदा घेत दुपारच्या वेळेस नराधाम बाप पोटच्या मुलीचे लैंगिक शोषण व अत्याचार करत असे. अनेक दिवसांपासून तिचे लैंगिक शोषण सुरू होते. हे कोणाला सांगितलं तर चाकूने तुला मारून टाकले. अशी धमकी देत पीडित मुलीवर बलात्कार करत असे. म्हणून भीतीपोटी पीडित मुलीने कोणाला सांगितले नाही.

परंतु, चालू महिन्याच्या 10 दिवसांपूर्वी पीडित मुलगी शेजाऱ्यांकडे राहायला गेली असता, नेहमी हसत खेळत राहणारी मुलगी शांत का? हा प्रश्न शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीला पडला. तिने पीडित मुलीची विचारपूर केली असता सर्व घडलेला प्रकार मैत्रिणीला सांगितला. ही सर्व घटना ऐकूण शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीला धक्काच बसला आणि तिने पीडित मुलीला घेऊन थेट पोलीस ठाणे गाठले आणि सविस्तर माहिती पोलिसांना दिली.

उत्तन सागरी पोलिसांनी सदर प्रकरणी नराधम बापाला अटक करण्यात असून, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 3 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.AM News Developed by Kalavati Technologies