धक्कादायक! उत्तर प्रदेशात बलात्काराच्या घटना थांबेना; बदायूंनंतर पुन्हा मुरादाबादमध्ये 19 वर्षीय मुलीवर बलात्कार

युपीच्या मुरादाबादमध्ये 19 वर्षीय मुलीवर बलात्कार करून, आरोपीने तिला छतावरून फेकून दिले

मुरादाबाद । उत्तर प्रदेशात महिला अत्याचारांच्या घटनात वाढ होतांना पाहायला मिळत आहे. बदायूं येथे 50 वर्षाच्या सामुहिक बलात्कार आणि हत्यानंतर पुन्हा आता मुरादाबाद मध्ये 19 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आलं आहे. सध्या मुलीची प्रकृती अत्यंत गंभीर असून, तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पिडीतेवर बलात्कार करून छतावरून फेकून दिले.

पिडीतेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत सांगण्यात आलं आहे की, सोमवारी रात्री घराच्या छतावरून आरोपी घरात घुसला. त्यानंतर त्याने पिडीतेला मारहाण केली. बंदुकीचं धाक दाखवत आरोपीने पिडीतेला छतावर नेऊन बलात्कार केले. पिडीतेने पळ काढण्याचा प्रयत्न केला असता. आरोपीने तिला छतावरून खाली फेकून दिले.

पिडीतेची रडण्याची आवाज येताच संपुर्ण कुटुंबाने धाव घेतली. व तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या पिडीतेची प्रकृती गंभीर आहे.AM News Developed by Kalavati Technologies