इंदापूर । जमिनीच्या वादातून पुतण्यानेच चुलतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील इंदापूर तालुक्यातील काटी या गावात सदरील प्रकार घडला आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही कुटुंबात जमिनीच्या वादावरून भांडणं होत होती. त्याचा राग अनावर आल्याने पुतण्याने चुलतीची डोक्यात कुऱ्हाडी टाकुन हत्या केली आहे. याबाबत मयत महिलेचा मुलगा सचिन साहेबराव भोसले याने इंदापूर पोलीसात फिर्याद दाखल केली असून, पोलीसांनी दोन आरोपींना अटक केली असून, तिसरा आरोपी गंभार जखमी असल्याची माहिती मिळत आहे.
धक्कादायक! जमिनीच्या वादातून पुतण्यानेच केली चुलतीची डोक्यात कुऱ्हाड टाकून हत्या
इंदापूराच्या काटी गावात जमिनीच्या वादातून पुतण्याने रागाच्या अनावर चुलतीची हत्या केल्याची घटना घडली आहे
