धक्कादायक! जोधपूरात पतीकडून पत्नीची भोसकून 'हत्या'

राजस्थानातील जोधपुरमध्ये एका व्यक्तीने आपल्या पतीच्य़ा पोटात कात्री खुपसून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

नवी दिल्ली । राजस्थानातील जोधपुरमध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या पोटात 'कात्री' खुपसून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विक्रम सिंह (वय 35) असे आरोपीचे नाव असून शिवकंवर सिंह (वय 30) असे मृत महिलेचे नाव आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात विक्रमने पत्नी शिवकंवर हिच्या पोटात कात्रीने वार केले. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने स्वत: पोलीस आणि नातेवाईकाला या घटनेची माहिती दिली आहे.

जोधपुर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता, शिवकंवर रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली होती. आणि तिचा पती विक्रम सिंह तिच्या बाजुला मोबाईलमध्ये व्हिडिओ गेम खेळत होता. त्यानंतर शिवकंवर हिला रुग्णालयात नेले असता तिला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून विक्रम बेरोज़गार झाला होता. त्यामुळे दोघांत नेहमी वाद होत असे. त्यामुळे रागाभरात विक्रमने ही हत्या केली अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.AM News Developed by Kalavati Technologies