धक्कादायक..! बदनामीच्या भीतीने अवघे एक दिवसाचे बाळ फेकले कचऱ्यात

प्रेमसंबंधातून झालेल्या एक दिवसाची जिवंत चिमुकलीला कचऱ्यात फेकून फरार झालेल्या नराधमाला मानपाड़ा पोलिसांनी केले गजाआड

कल्याण । अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध ठेऊन, या प्रेमप्रकरणातून अल्पवयीन तरुणीला गर्भवती बनवून तिला झालेल्या एक दिवसाचे महिला जातीय अर्भकाला फेकण्यास भाग पडणाऱ्या नराधमाला डोंबिवली मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. रोशन चौधरी असे या आरोपीचे नाव असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

18 जुलै रोजी डोंबिवली नजीक असलेल्या डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पलावा नदी किनारी असलेल्या निर्जन स्थळी जिवंत अर्भक फेकण्यात आल्याची माहिती मिळताच मानपाडा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, हे अर्भक जिवंत असल्याचे आढळून आले. त्यांनी तातडीने या बाळाला कपड्याने पुसून स्वच्छ करत त्याला डायघर पोलीसांच्या हवाली करण्यात आले. तिथून या बालकाला बालगृहात धाडण्यात आले असून या प्रकरणाचा तपास सुरु केला.

चौकशी करताना मानपाडा हद्दीतील 15 वर्षीय अल्पवयीन तरुणीने प्रेमसंबंधातून जन्माला आलेले बाळ या परिसरात फेकल्याची माहिती मिळाली त्या नंतर पोलिसांनी सदर तरुणीला विचारपुस केली असता त्याच परिसरात राहणाऱ्या रोशन चौधरी याच्या बरोबर तिचे प्रेमसंबंध असून त्यातून ती गर्भवती झाली असून तिला झालेल्या एक दिवसाचे महिला जातीय अर्भकाला रोशनने फेकण्यास सांगितल्याची माहिती तरुणीने देताच मानपाडा पोलिसांनी आरोपी रोशन चौधरी या नराधमाला गजाआड करून कल्याण सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.AM News Developed by Kalavati Technologies