धक्कादायक! जिंतूरमध्ये विवाहित महिलेवर पाशवी बलात्कार

जिंतूर शहरात एका विवाहित महिलेवर पाशवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

जिंतूर । जिंतूर शहरात एका विवाहित महिलेवर पाशवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडल्याने शहरात खळबळ माजली आहे. मानूसकीला काळिमा फासणारी ही संतापजनक घटना जालना रोडच्या बाजूस असणाऱ्या एका घरात घडली. याविषयी अधिकृत माहिती अशी की, शहरालगत असणाऱ्या जालना हायवे मार्गावर आंनद हॉटेलच्या मागे असणाऱ्या एका हिंगोलीच्या विवाहित 21 वर्षीय महिलेस एका आरोपीने घरात बळजबरीने डांबून पाशवी बलात्कार केला. विशेष बाब म्हणजे सलग तीन दिवस सदर आरोपीने असाह्य महिलेवर बलात्कार केल्याचे उघड झाले आहे.

सदर दुर्दैवी घटना तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून उघड झाली आहे. 29 सप्टेंबरच्या सकाळीच पिडीतीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात कलम 376,392,368,506 भादवीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. या फिर्यादीवरून आरोपीची ओळख झाल्यानंतर पीएसआय रवी मुंढे व पथकातील पोलीस कर्मचारी हाके, नरवाडे, महिला पोलीस कर्मचारी जोगदंड व गृहरक्षक अनुराग शर्मा या पथकाने शिताफीने आरोपीस येलदरी मार्गावरील छत्रपती शिवाजी चौकात जेरबंद केले. पुढील तपास सहायक पोलिस अधीक्षक श्रवण दत्त व पो.नी. अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.AM News Developed by Kalavati Technologies