धक्कादायक! पाच रुपयाच्या मागणीवरून, बापाने केली दीड वर्षाच्या मुलीची हत्या

दीड वर्षाच्या मुलीने पाच रुपयाची मागणी केली असता, बापाने तिला भींतीवर आपटले होते. या घटनेत मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

गोंदिया । मुलीचे पैसे मागितले म्हणून, बापाने आपल्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना गोंदियातील लोनार येथे घडली आहे. स्वत:च्या दीड वर्षाच्या मुलीने त्याच्या वडीलांना पाच रुपयाची मागणी केली होती. त्याचा राग आल्याने त्याने मुलीला धरून भींतीवर आपटले. त्या घटनेत त्या दीड वर्षाच्या चिमुकल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सदरील आरोपीच्या पत्नीने आपल्या पतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरोपीला बापाला अटक करण्यात आली आहे. बापानेच आपल्या मुलीची हत्या केल्याने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक असे आरोपीचे नाव असून, तो लोनार येथे आपल्या पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलीसोबत राहत होता. 2 फेब्रुवारीला विवेक संध्याकाळी घरी परतला. तेव्हा त्याच्या पत्नीने मुलीसाठी पाच रुपयांची मागणी केली. त्याचा राग अनावर झाल्याने विवेकने आपल्या दीड वर्षाच्या मुलीला भींतीवर आपटले. व त्या घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.



AM News Developed by Kalavati Technologies