धक्कादायक! हाथरसनंतर दिल्लीतील गुरुग्राममध्ये 32 वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार

दिल्लीतील गुरुग्राममध्ये एका 32 वर्षीय तरुणीवर फूड डिलिव्हरी करण्याऱ्या चार जणांना सामुहिक बलात्कार केला आहे.

नवी दिल्ली । हाथरस येथील बलात्काराची घटना ताजीच असतांना पुन्हा एकदा एका 32 वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. सदरील घटना दिल्लीतील गुरुग्राम येथे घडली असून, नराधमांनी पहिलेवर बलात्कार करून, तिला मोठ्या प्रमाणात मारहाण सुद्धा केली. त्यामुळे त्या महिलेच्या डोक्याला जबर मार लावला आहे. त्यानंतर पीडितेला उपचारासाठी जवळील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र पीडितेची प्रकृती खालावल्याने तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

गुरुग्राम पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरील घटना गुरुग्रामातील डीएलएफ-2 या परिसरात घडली आहे. पोलीसांनी सदरील घटनेतील चार नराधमांना अटक केली असून, चारही आरोपी हे फूड डिलीवरी कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. पोलीसांनी या चारही आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून अधिक तपास करण्यात येत आहे.AM News Developed by Kalavati Technologies