हॅट्स ऑफ किरण! 19 वर्षांच्या किरणने कँसरग्रस्तांसाठी केस केले दान

किरण सध्या औरंगाबादमध्ये पत्रकारितेचं शिक्षण घेत आहे.

औरंगाबाद | कर्करोग हा जीवघेणा रोग आहे. दिवसेंदिवस हा रोग असणाऱ्यांची संख्या वाढताना दिसतेय. याच्या उपचाराच्या काळात सतत घेतल्या जाणाऱ्या केमोथेरपीमुळे अनेकदा महिलांचे केस जातात. केस हे महिलांचे सौंदर्य असते. कर्करोगग्रस्त स्त्रियांसाठी केसांशिवाय कसं जगणार ही एक मोठी समस्या असते. या समस्येवर केस दान करून एखाद्याच्या आयुष्यात गेलेला आनंद परत देता येऊ शकतो याच उद्देशाने औरंगाबादमधील 19 वर्षीय किरण गीते हिने नुकतेच कर्करोगग्रस्तांसाठी केस दान करत समाजासमोर एक वेगळा आदर्श तयार केला आहे. तिच्या या निर्णयामुळे सर्व स्तरातून तिचे कौतुक केले जात आहे.

किरणच्या एका मैत्रिणीला कँसर झाला होता. तिचा कर्करोग बरा होऊ शकत नाही हे तिला कळालं होते. आपण तिच्यासाठी काहीच करु शकत नाही अशी खंत किरणच्या मनात होती. तिच्यासाठी काहीतरी करावं अशी इच्छा तिला होती. याच हेतूने किरणने रविवारी कर्करोगग्रस्तांसाठी केस दान केले. किरण सध्या औरंगाबादमध्ये पत्रकारितेचं शिक्षण घेत आहे. एवढ्या लहान वयात घेतलेल्या या धाडसी निर्णयामुळे तिच्यावर सध्या कौतुकाचं वर्षाव होत आहे.

किरण या रुग्णांचे शारीरिक त्रास तर कमी करु शकत नाही. मात्र त्यांना मानसिक धीर देण्यासाठी आपले केस नक्कीच देऊ शकते. हा विचार मनात आल्यानंतर तिने केस दान करण्याचा निर्णय घेतला. किरणने रविवारी संध्याकाळी आपले केस कापले. एका पाकिटामध्ये व्यवस्थितरित्या पॅक करून पुण्यातील एका संस्थेला पाठवले. आता तिच्या केसांपासून विग तयार करण्यात येणार आहे. आपल्या केस दान केल्याने एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य येणार यामुळे किरण समाधानी आहे.AM News Developed by Kalavati Technologies