खळबळजनक..! अनैतिक संबंधाच्या संशयावरून नागपूरात दोघांची हत्या

पत्नीचा अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याने, स्वत:च्या पत्नीची आणि संशयीताची केली कुऱ्हाडीने हत्या

नागपूर । अनैतिक संबंधाच्या संशयावरून नागपूरात दोघांची हत्या करण्यात आली आहे. नागपूरच्या अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कल्यानेश्वर नगरात हत्येची ही घटना रविवारी मध्यरात्री घडली. किरण बरमय्या व शिवा अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. तर कुंवरलाल बरमय्या असे आरोपीचे नाव आहे. पत्नी किरण व शिवा यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय पती कुंवरलाल याला होता, या कारणावरून पती-पत्नीत यापूर्वी देखील वाद झाला होता.

रविवारी मध्यरात्री देखील त्यांच्यात भांडण झाले होते. वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी भांवरलालने घरातील कुऱ्हाडीने पत्नीवर वार केले, पत्नीवर वार करून शिवाकडे गेला व त्याच्यावरही कुऱ्हाडीने वार केले. सदरील घटनेची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहचले परंतु तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. पोलिसांनी आरोपी पती भांवरलाल याला अटक केली असून पुढील तपास नागपूर पोलीस करीत आहेत.AM News Developed by Kalavati Technologies