पुण्यात सामजिक सुरक्षा विभागाने; विदेशी 'सेक्स रॅकेट'चा केला पर्दाफाश

पिंपरी चिंडवडमधील सांगवी हद्दीत पोलीसांनी धाड टाकून इंचरनॅशनल सेक्स रॅकेट उध्वस्त केला आहे. त्यात नायजेरियन महिलांचा समावेश आहे

पुणे । पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामजिक सुरक्षा विभागाने आज एक मोठा सेक्स रॅकेटवर धाड टाकून उध्वस्त केला आहे. सांगवी पोलिस स्टेशन हद्दीतील ओमकार कॉलनी येथील वक्रतुंड बिल्डींगमध्ये धाड टाकून, पोलिसांनी हा सेक्स रॅकेट उध्दव केला आहे. या धाडीत जवळपास 16 नायजेरियन तरुणींची सामाजिक सुरक्षा विभागाने सुटका केली आहे.

पिंगळे गुरव परिसरातील ओंकार कॉलनी येथील वक्रतुंड बिल्डींगमध्ये विदेशी तरुणीच्या माध्यमातून देह विक्रीचा व्यवसाय केला जातो. अशी गुप्त माहिती सामाजिक सुरक्षा विभाग पोलिसांनी मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे डमी कस्टमर बनवून पोलिसांनी ही धाड टाकून हा रॅकेट उद्धव करण्यात यश आलं आहे. देह विक्री करणाऱ्या महिला या नायजेरियाच्या असल्याचं पोलिस तपासत निष्पन्न झालं आहे.AM News Developed by Kalavati Technologies