आयसीसी महिला टी 20 रॅंकिंग, शैफाली वर्माने अव्वल स्थान गमावले

आयसीसी महिला टी -20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत भारताची युवा फलंदाज शेफाली वर्माची तिसर्‍या स्थानावर घसरण झाली आहे.

मुंबई | आयसीसी महिला टी -20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत भारताची युवा फलंदाज शैफाली वर्माची तिसर्‍या स्थानावर घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे झालेल्या वर्ल्डकप फायनलमध्ये तिने केवळ दोन धावा काढल्या होत्या. ऑस्ट्रेलियामध्ये नुकत्याच पार पडलेल्या टी -20 विश्वचषक स्पर्धेच्या लीग टप्प्यानंतर 16 वर्षांच्या शेफालीने (744 गुण) अव्वल स्थान मिळविले होते. ऑस्ट्रेलियाच्या संघाने अंतिम सामन्यात भारताला पराभूत करत पाचव्यांदा विजेतेपदाला गवासणी घातली होती.

अंतिम सामन्यात नाबाद 78 धावा करणाऱ्या बेथ मूनीने दोन स्थानांची झेप घेत 762 गुणांसह अव्वल स्थान गाठले आहे. मूनीने सहा डावांमध्ये 64 च्या सरासरीने 259 धावा फटकावल्या होत्या. मूनीच्या या कामगिरीने तिला‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’म्हणून गौरविण्यात आले होते. आपल्या तुफानी कामगिरीच्या जोरावर मूनीने कारकीर्दीत पहिल्यांदाच अव्वल स्थान गाठले आहे. तर या यादीत न्यूझीलंडचा सुझी बेट्स (750 गुण) गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे,.

पहिल्या 10 खेळाडूच्या यादीत भारताची स्मृती मंधाना आणि जेमिमा रोड्रिग्जचा देखील समावेश आहे. भारतीय उपकर्णधार मंधाना एक स्थान घसरून सातव्या स्थानावर, तर रॉड्रिग्जने नववे स्थान कायम राखले. मुनीची सलामीवीर एलिसा हेली दोन स्थानांची झेप घेत पाचव्या स्थानावर आली आहे.AM News Developed by Kalavati Technologies