'होम ड्रॉप' रात्री एकट्या महिलांना आता पोलीस पोहचवणार घरी, सुविधेचा गैर वापर केल्यास कारवाई

नागपूर पोलिसांनी सुरु केला 'होम ड्रॉप' उपक्रम

नागपूर । नागपूर पोलिसांच महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचं पाऊल उचललं आहे. रात्रीच्या वेळी महिलांना घरी जाण्यास उशीर होत असेल आणि जाण्यासाठी एखादं साधन मिळत नसेल तर पोलीस त्या गरजू महिलेला त्यांच्या घरापर्यंत सोडणार आहेत. महिलांनी पोलिसांच्या या नव्या अभियानाचा स्वागत केलं आहे.

नागपुरातील महिलांसाठी खुश खबर, आता नागपुरातील महिलांना रात्री घरी जायला उशीर झाला असेल किंवा कुठे अडकल्या असेल तर चिंता नाही. नागपूर पोलिसांना फोन करा ते तुम्हाला तुमच्या घरापर्यंत सुखरूप सोडणार. हो हे खरं आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना आणि महिला सुरक्षेविषयी निर्माण झालेले प्रश्न बघता नागपूर पोलिसांनी ''होम ड्रॉप'' हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. रात्री ९ वाजता पासून तर पहाटे ६ वाजे पर्यंत ही सुविधा देण्यात येणार आहे. ही सेवा कंट्रोल रूम आणि पोलीस स्टेशनमधून देण्यात येणार आहे. मात्र, एखाद वेळी पोलीस पोहचायला उशीर होत असेल तर बाईक वरील बिट मार्शल त्या ठिकाणी पोहचेल आणि पोलीस गाडी येई पर्यंत महिले सोबत थांबेल. मात्र या सुविधेचा गैर वापर केल्यास कारवाई सुद्धा होईल.

नागपूर शहर मोठ्या प्रमाणात वाढत आहे, वाढत्या शहरामुळे घराचं अंतर लांब झालं आहे. कामकाजी महिलांना आता बरेचदा उशिरा पर्यंत काम करावं लागत आणि मग घरी जाण्यासाठी वाहन मिळत नाही किंवा काही परिसरात भीतीच वातावरण सुद्धा असते. अशात महिलांनी पोलीस स्टेशन किंवा कंट्रोल रूमला फोन करून आपण असलेलं ठिकाण सांगायचं आणि आपली समस्या सांगायची. ड्युटीवर तैनात असलेले पोलीस एक महिला पोलीस घेऊन त्या ठिकाणी पोहचेल आणि त्या महिलेला तिने सांगितलेल्या पत्त्यावर पोहचवून देतील. यामुळे महिलांना चांगली सुरक्षा आणि शहर सुद्धा सुरक्षित राहील असं महिला सांगतात.

हैद्राबादमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचार व हत्येच्या घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशात महिला सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर पोलिसांनी उचललेलं हे पाऊल स्वागतार्ह्य असून महिला सुद्धा पोलिसांचं अभिनंदन करत आहेत.AM News Developed by Kalavati Technologies