#Flashback2019 : 'या' महिलांसाठी विशेष ठरले यंदाचे वर्ष

यामध्ये निर्मला सितारमण, गगनदीप कंग, तसंच जीएस लक्ष्मी बरोबरच अश्या अनेक महिलांचा यामध्ये सामावेश आहे...

स्पेशल डेस्क | 2019 हे वर्ष आता संपत आलं आहे. अनेक गोष्टींसाठी हे वर्ष महत्त्वपूर्ण ठरलं. तसंच या वर्षात अनेक महिला विशेष ठरल्या आहेत. हे वर्ष या महिलांसाठी विशेष लक्षणीय ठरलय. या वर्षीच्या अनेक महिला महनतीच्या आणि जद्दीच्या जोरांवर प्रगतीपथावर पोहचल्या आहेत. यामध्ये निर्मला सितारमण, गगनदीप कंग, तसंच जीएस लक्ष्मी बरोबरच अश्या अनेक महिलांचा यामध्ये सामावेश आहे...

हिना जायसवाल
भारतीय वायु सेनाची फ्लाईट लेफ्टिनंट हिना जायसवाल देशातील पहिली महिला फ्लाइट इंजिनियर आहे. भारतीय वायु सेनेनं हिना जायसवालला पहिला महिला फ्लाइट लेफ्टनंट म्हणून सामिल केलंय. हिना या बंगलूरुच्या येलाहांक एयर बेसच्या 112 वीं हेलीकॉफ्टर यूनिट की फ्लाईट लेफ्टिनंट होत्या.

निर्मला सीतारमण
देशातील पहिली पुर्णवेळ महिला अर्थमंत्री निर्मला सीतारमणनं या सर्वात कमी राजकीय कार्यकाळातील अर्थमंत्री ठरल्यात. काही काळासाठी त्या भारताच्या संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय. इंदिरा गांधीनंतर भारताच्या दुसऱ्या महिला अर्थमंत्री मिळवण्याचा मान निर्मला सीतारमण यांनी मिळवलाय.

कॅप्टन आरोही पंडित
मुंबईच्या राहणाऱ्या 23 वर्षीय कॅप्टन आरोही पंडित या लाईट स्पोटर्स एयरक्राफ्टमध्ये एकमेव अटलांटिक महासागर पार करणारी जगातील पहिली महिला आहे. आरोही यांनी 3000 किलोमीटरच्या अंतर पार करत छोटेसे एयरक्राफ्ट के त्यांनी ही सफर पार केलीये.

गगनदीप कंग
भारतीय वंशाची वैज्ञानिक गगनदीप कंग रॉयल सोसायटीमध्ये जाणारी पहिली महिला आहे. गगनदीप कंग या हरियाणाच्या फरीदाबादच्या राहणाऱ्या आहेत. गगनदीप प्रतिष्ठित फेलो रॉयल सोसायटी मध्ये 358 वर्षाच्या इतिहासामध्ये एक वेगळ्या पहिल्या भारतीय महिला वैज्ञानिक आहेत.

वृंदा राठी
देशाच्या महिलांमध्ये आता क्रिकेटमध्ये अंपारयरिंगमध्ये देखील महिला मागे नाहीत. नवी मुंबईच्या 29 वर्षीय वृदा राठी या मुंबई लोकल मॅचच्या अंपारयरिंग करताना पाहायला मिळाल्या. राठी क्रिकेटर देखील होत्या. मॅच रेफरीसाठी बीसीसीसआईच्या दुसऱ्या स्तरापर्यतं त्या पोहंचल्या आहेत.

जी एस लक्ष्मी
भारतच्या जीएस लक्ष्मी इंटरनॅशनल क्रिकेट काउंसिल इवेंटच्या पहली महिला पंच बनल्या आहे. आयसीसीमध्ये त्याला आयसीसी पुरुष टी 20 विश्वचषक पात्रता 2019च्या लीग सामन्यासाठी सामन्याच्या अधिकाऱ्यांची यादी जाहिर केली. त्यामध्ये जी एस लक्ष्मी यांचा सामावेश आहे...

शुभांगी स्वरुप
भारतीय नौदलाच्या इतिहासात शुभांगी स्वरुप यांचं नाव कोरलं गेलय. कारण शुभांगी स्वरुप या नौसेनेच्या पहिल्या महिला पायलट आहेत.. शुभांगी या दोन वर्षापूर्वी भारतीय नौसैनिक आकादमीतून पदवीधर झालेल्या महिला अधिकाऱ्यामधील एक होत्या. हैदराबादमध्ये पायलट ची ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर शुभांगी यांनी कोच्चिमध्ये नौसेनेच्या ऑपरेशन ड्युटी मध्ये सामिल केलं गेलं होतं.

स्मृति मंधाना
भारतीय महिला सलामी फलंदाज स्मृति मंधाना यांना या वर्षीच्या आईसीसी वनडे आणि टी - 20 संघात सहभागी केलय. मंधाना यांनी भारतासाठी आत्तापर्यत दोन कसोटी सामन्यात 81 रन तर 51 वनडे सामन्यात 2025 रन केलेत. आणि 66 टी - 20 सामन्यात 1451 रन बनवत खेळल्या खेळल्या आहे..

चंद्राणी मुर्मू
लोकसभा निवडणूक 2019 मध्ये बीजेडीच्या सगळ्यात कमी वयाच्या आदिवासी महिला खासदार चंद्राणी मुर्मू संसदेत जाणाऱ्या पहिल्या महिला आहेत. त्या सगळ्यात कमी वयाच्या महिला खासदार झाल्या आहेत. मुर्मू यांचं वय केवळ 25 वर्ष आहे आणि त्या इंजिनियर आहेत. मुर्मू यांनी ओडिशाच्या केन्झार लोससभा मतदारसंघातून विजय मिळवलाय..

हिमा दास
आशियायी खेळामध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या हिमा दास 2019 च्या महिलांमधील एक विश्वसनीय महिला आहेत.. हिमा यांनी या वर्षी एकूण 6 गोल्ड मेडल आपल्या नावावर कोरले आहेत.. वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी ही कामगीरी हिमा दास पहिला महिला भारतीय ठरलीये.. हिमा दास यांना अर्जुन अवार्डनं सन्मानितही केलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies