कॅन्सरसारख्या आजाराने पीडित महिलांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याची गरज - अमृता फडणवीस

कलानिधी संस्था आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची उपस्थिती

ठाणे । कॅन्सरसारख्या रोगाने पीडित महिलांच्या मागे समाजाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. त्यांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे. तसेच कॅन्सर पीडित महिला आणि महिलांना होणाऱ्या इतर आजारांमागे सर्व समाजाने, सामाजिक संस्थांनी खंबीरपणे उभे राहून त्यांना मदत केली पाहिजे. सरकार मदत करत आहेच, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी ठाण्यात व्यक्त केली. त्या कलानिधी संस्था आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित कर्यक्रमाला उपस्थित होत्या.

विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करून महिलांनी भरारी घेतली, अशा सर्व महिलांचे कौतुक करत त्यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी 100 कर्तृत्ववान महिलांचा `वुमन ऑफ सबस्टन्स` या पुरस्काराने सत्कार केला. विविध क्षेत्रांत भरारी घेणाऱ्या महिला या देशाचा खऱ्या अर्थाने गौरव ठरत आहेत. अशा कर्तृत्ववान महिलांना सरकार मदत करतेच, पण सामाजिक संस्थांनीही मदत करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाला ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल, ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या दरम्यान महिलांनी विविध रंगेबेरंगी साड्या परिधान करून रॅम्पवॉक केला.AM News Developed by Kalavati Technologies