त्या नराधमांना तातडीने अटक करा - विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे - दरेकर

पुणे । जिल्हयातील खेड तालुक्यातल्या धोपडवाडी येथील आरती कलवडे या सतरा वर्षाच्या तरुणीची विवस्त्र करुन हत्या करण्यात आली. या मुलीवर ज्या नराधमानी अत्याचार करुन हत्या केली. पोलिसांनी त्यांना तातडीने अटक करावी. अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.
ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या घटनास्थळी त्यांनी भेट दिली.

यावेळी आरती कलवडेच्या कुटुंबियाशी संवाद साधत त्यांना धीर दिला. त्यानतंर त्यांनी पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्तलायास त्यांनी भेट दिली. आणि तातडीने कारवाईची मागणी केली. या घटनेसोबत क्वॉरंटाईन सेंटर मधील महिलांचा विनयभंग होणे अशा घटना घडल्या असुन, या राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असुन राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. महिला सुरक्षित असल्याच पाहिजे याकरीता कडक कायदे करण्याची गरज असल्याचे मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.AM News Developed by Kalavati Technologies