धक्कादायक! जन्मदात्या आईनेच केला 4 वर्षीय चिमुकलीचा खून..

मुलगी त्रास देत असल्यामुळे आईनेच केला स्वत:च्या मुलीचा खून, पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार

पुणे । पिंपरी-चिंचवडमधून एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलगी त्रास देत असल्याच्या रागातून जन्मदात्या आईनेच आपल्या चार वर्षीय मुलीचा निघृणपणे खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना सांगवी परिसरातील असून या प्रकरणी आरोपी आईला सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत रिया काकडे या चार वर्षीय मुलीचा या घटनेत मृत्यू झाला आहे. सांगवितील भालेकर नगरमध्ये सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. सविता काकडे असे आरोपी आईचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षीय रियाचा आईने खून केल्याची घटना पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवीत घडली आहे. या प्रकरणी आईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घरात सासू, सासरे, दोन मुलं, पती हे सर्व जण राहतात. मात्र, सासूच्या मृत्यू झाल्याने त्यांचा दशक्रिया विधी असल्याने आज सर्व जण बाहेरगावी गेले होते. घरात सहा महिन्यांचा चिमुकला, चार वर्षांची रिया हेच होते.

तेव्हा, आज सकाळी रिया त्रास देत असल्याने रागवलेल्या आईने आधी फरशीवर मुलीला आदळले नंतर चार्जरच्या वायरने तिचा गळा आवळून खून केला. दरम्यान, आरोपी सविता यांचे मानसिक संतुलन ठीक नसल्याचे ही सांगण्यात येत आहे. सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.AM News Developed by Kalavati Technologies