उद्धव ठाकरेंना चॉकलेट द्या, वाईट वाटलं असेल; नीलेश राणे यांचा टोला

राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभुमीवर त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून हल्ला चढविला

मुंबई । शिवसेना नेते संजय राऊत यांना टीव्ही आणि लाईट बिलचे पैसे, तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना कॅडबरी चॉकलेट द्या, अशी जहरी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून हल्ला चढविला.

संजय राऊत इतके गरीब आहे की, ते मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद बघायला पवार साहेबांच्या घरी गेले. बाकी राहुद्या त्यांना अगोदर कोणी तरी टीव्ही आणि लाईट बिलाचे पैसे द्या आणि उध्दव ठाकरे यांना चॉकलेट द्या बिचाऱ्याला वाईट वाटलं की त्याला खोटारडा म्हटलं. असं निलेश राणे यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies