शरद पवारांच्या जवळचाच नेता सोडणार साथ, यांनी दिला आमदारकीचा राजीनामा?

सातारा-कोल्हापूर पूरस्थितीमुळे भाजप प्रवेश ढकला पुढे

मुंबई । शरद पवारांचे विश्वासू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कळंब-उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भातील संकेत त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिले असून राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा सुरु आहेत. बकरी ईदच्या शुभेच्छा देताना शेअर केलेल्या फोटोवर राणा पाटील यांनी आमदारपदाचा उल्लेख टाळला आहे. त्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याच्या चर्चांनी अधिकच जोर धरला आहे.

दरम्यान सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथील पूरस्थितीमुळे राणा पाटलांचा भाजप प्रवेश पुढे ढकलण्यात आला होता अशी माहिती आहे. गेल्या काही दिवसांत अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत सत्ताधारी पक्षाची वाट धरली आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, सचिन अहिर या बड्या नेत्यांच्या नावाचाही समावेश आहे. तसंच नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे मोठे नेते गणेश नाईक हेदखील लवकरच भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी अडचणीत आली आहे.AM News Developed by Kalavati Technologies