पवार साहेब रोहित पवारांना नामदार करा, कर्जत-जामखेड मतदरसंघात फलक झळकले

कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघामध्ये पुन्हा मंत्री व पालकमंत्रिपद मिळणार काय

अहमदनगर । कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघामध्ये पुन्हा मंत्री व पालकमंत्रिपद मिळणार काय याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या मतदारसंघांमधून निवडून गेलेले आमदार रोहित पवार यांना राज्याच्या मंत्रिमंडळात संधी मिळावी अशी मागणी दोन्ही तालुक्यातील नागरिक करू लागले आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघाला विकासात्मक दृष्टीकोन असणारं तरुण व कार्यक्षम नेतृत्व पवार यांच्या रूपाने लाभलं असल्याची चर्चा आता येथील नागरिकांमध्ये सुरु आहे. त्यामुळे जर त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली कर कर्जत-जामखेडचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कार्यकर्तांकडून पाहायला मिळत आहे.AM News Developed by Kalavati Technologies