काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांच्या सत्तास्थापनेसाठी हालचाली, राज्यपालांच्या निर्णयाकडे लक्ष

पाच वर्षात भाजप सरकारने एकही पायाभूत काम केले नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

मुंबई । पाच वर्षात भाजप सरकारने एकही पायाभूत काम केले नाही; असा आरोप नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नाकर्तेपणामुळे जनतेने भाजपला बहुमत नाकारले आहे असंही मत पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी मांडले.  

दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभेच्या निकालानंतर मुख्यमंत्री कोणाचा होणार यावरून अखेरच्या दिवसापर्यंत महायुतीमध्ये तणावाचे वातावरण आहे. खरे-खोटेपणावरून देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. मुख्यमंत्र्य़ांच्या आरोपांना उत्तर देताना ठाकरे यांनी भाजपाला 1999 ची आठवण करून दिली आहे. 1995 मध्ये महाराष्ट्रात आणि केंद्रात भाजपा-शिवसेनेचे सरकार होते. मात्र, 1999 मध्ये मध्यावधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगळी लढूनही युतीपेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या. मात्र, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यावर विदेशी असल्याचा आरोप करत शरद पवार यांनी वेगळी चूल मांडली होती. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केल्याने या पक्षाची ही पहिलीच निवडणूक होती. या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढले होते. निकालानंतर काँग्रेसला 75, राष्ट्रवादीला 58 जागा मिळाल्या होत्या. तर शिवसेना आणि भाजपाने आघाडी केली होती. शिवसेनेला 75 तर भाजपाला 58 जागा मिळाल्या होत्या. युतीचीच सत्ता असल्याने भाजपाच्या नेत्यांना आपणच सरकार स्थापन करू असा विश्वास होता. मात्र, युती सरकार स्थापन करण्यास अपयशी ठरली आणि हीच वेळ काँग्रेस राष्ट्रवादीने साधली.AM News Developed by Kalavati Technologies