राष्ट्रवादीचे पारडे सर्वात जड, मिळाली मलाईदार आणि महत्त्वाची खाती

महत्त्वाची आणि मलाईदार खाते राष्ट्रवादीच्या पारड्यात पडली आहेत.

मुंबई | राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन सहा दिवस उलटून गेल्यानंतर आज अखेर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली. यानंतर खातेवाटपाची अधिकृत यादी समोर आली. दरम्यान महत्त्वाची आणि मलाईदार खाते राष्ट्रवादीच्या पारड्यात पडली आहेत. तर महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद काँग्रेसच्या पारड्यात पडले आहे.

या ठाकरे सरकारच्या खातेवाटपामध्ये राष्ट्रवादीनेच बाजी मारली. महत्त्वाचं म्हणजे राज्याचं जेवढं बजेट आहे, त्याच्या निम्म्या बजेटची खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहेत. आज झालेल्या खातेवाटपानुसार राष्ट्रवादीच्या वाट्याला अर्थ व नियोजन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, राज्य उत्पादन शुल्क, जलसंपदा व लाभक्षेत्र, गृह, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, ग्राम विकास, अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास आणि उद्योजकता, गृहनिर्माण, सहकार व पणन आणि सामाजिक न्याय व विशेष विभाग आले आहेत.



AM News Developed by Kalavati Technologies