पंकजा मुंडेंच्या नाराजीवर विनोद तावडेंचं स्पष्टीकरण

पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं?, यासंबंधी मी 12 डिसेंबर रोजी सांगणार आहे - पंकजा मुंडे

मुंबई । मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे असा दावा करणाऱ्या पंकजा मुंडे यांना या पराभवामुळे मोठा धक्का बसला. त्यांच्या राजकीय कारकिर्दीला हा मोठा धक्का मानला जातो. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून त्या अस्वस्थ असल्याचं मानलं जातंय. त्यामुळे मला तुमच्याशी बोलायचं आहे असं सांगत त्यांनी फेसबुकवरून आपल्या भावना व्यक्त केल्या. अंतर्गत राजकारण आणि पक्षात कमी होत जाणारं महत्त्व यामुळे पंकजा मुंडे या नाराज आहे असं त्यांच्या जवळच्या लोकांकडून सांगितलं जातं आहे. तसेच मुंडे-महाजन कुटुंबाचे ठाकरे कुटुंबाशी चांगले संबंध आहेत, परंतु याचा अर्थ त्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत असं नाही या बातम्या चुकीच्या आहेत. पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट ही 12 तारखेच्या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे. अस स्पष्टीकरण भाजप नेते विनोद तावडेंनी दिलं आहे.

पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट शनिवारी व्हायरल झाली होती. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं?, यासंबंधी मी 12 डिसेंबर रोजी सांगणार आहे, असे पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. पंकजाच्या या पोस्टमुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात असतानाच आज सकाळी पंकजा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून भाजपचा उल्लेख गायब आहे. यापूर्वी पंकजा यांच्या ट्विटर प्रोफाइलमध्ये त्यांच्या मंत्रिपदाचा उल्लेख होता. मात्र, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तो हटवण्यात आला. आता मात्र भाजप नेत्या किंवा भाजप संदर्भातला कोणताही उल्लेख त्यांनी अकाउंटवर ठेवलेला नाही. कव्हरपेजवर जनतेला अभिवादन करणारा त्यांचा फोटो आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचं छायाचित्र आहे.AM News Developed by Kalavati Technologies