जुनी छायाचित्रे व व्हिडिओ टाकून सोशल मीडियावर अफवा पसरवू नये- राज्य शासनाचे आवाहन

जुनी छायाचित्रे व व्हिडिओ टाकून सोशल मीडियावर अफवा पसरवू नये- राज्य शासनाचे आवाहन

मुंबई । सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामधील पूरग्रस्त क्षेत्रातील बाधितांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत लाखो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. तसेच मदतकार्य सुरू आहे. पाण्याची पातळी कमी होत असून जिल्हा पातळीवरून शासन मदत करीत आहे.

मात्र, समाजमाध्यमांवर जुनी छायाचित्रे व व्हिडिओ दाखवून नागरिकांमध्ये अफवा पसरविल्या जात आहेत. जुन्या पोस्ट टाकल्यामुळे प्रशासनावर ताण निर्माण होत आहे. तरी अशी जुनी छायाचित्रे व व्हिडिओ आणि त्यासंबंधीच्या विविध पोस्ट पुन्हा-पुन्हा पोस्ट करू नयेत. नागरिकांनीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies