मंत्रिमंडळ बंगल्यांचं वाटप उद्धव ठाकरे "वर्षा"वर तर देवेंद्र फडणवीस "सागर" बंगल्यात राहणार

छगन भुजबळ रामटेक बंगल्यात तर जयंत पाटील सेवासदनात राहणार

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मोठ्या मताधिक्क्याने जिंकल्यानंतर सर्वांच्या नजरा राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर लागल्या होत्या. तोही पार पडला आता ठाकरे मंत्रिमंडळातील मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप झाले आहे.  उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगला देण्यात आला आहे. तर छगन भुजबळ पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या 'रामटेक' बंगल्यावर परतणार आहेत. याशिवाय विनोद तावडे यांच्या 'सेवासदन' बंगल्यात जयंत पाटील राहतील. पंकजा मुंडे यांच्या 'रॉयल स्टोन' बंगल्यात एकनाथ शिंदे राहणार आहेत.

राज्याचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी 28 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शपधविधीनंतर उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी औपचारिकरित्या आपला कार्यभार स्वीकारला.AM News Developed by Kalavati Technologies